Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#दिपोत्सव

SEE WINNERS

Share with friends

स्टोरीमिरर आयोजित "दिपोत्सव" राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा

सजवूनी दीप मांगल्याचे आला दीपोत्सव घराघरात लेवूनी आशेची किरणे विसावली प्रत्येक मन मंदिरात

   दिवाळी सण म्हणजे दीपोत्सव भारतीय संस्कृतीला लाभलेला अनमोल सण.......... अतिशय आनंद आणि उत्साहात नैराश्याला दूर सारून आकांक्षांचे दीप

उजळून जीवनाला नवी दिशा देणारे मार्गदर्शक.

आपले जीवन खूप सुंदर आहे. ते जगत असतांना आयुष्यात सुख -दु:खाचे गोड -कटू प्रसंग येतात . सुखात सौख्यदीप आपल्याला भरभरून सुख देतो. तसा दु:खात आपले सांत्वन करून ,मनोबल वाढवून आपल्याला सकारात्मक मार्ग दाखवण्याचं काम धैर्यदीप करतो. स्नेहवृद्धिसाठी स्नेहदीप आपलं नियोजन ठेवतो .दीप कोणताही असो पण तो दीपच असतो.आपल्या भारतीय संस्कृती नुसार आपण सण व उत्सव साजरे केले जातात . त्यात दीप तेजोमय कार्याच्या प्रमुख भूमिकेत पहिला आहे . सुख समृद्धी आणि आनंदाचा सण म्हणजेच दिवाळी. या सणाला लक्ष लक्ष दिव्यांच्या झगमगाटानं सारा आसमंत उजळून येतो. वास्तविक पाहता दीप म्हणजे तिमिरातून तेजाकडे वाटचाल करण्यासाठीची आपल्या साऱ्यांच्या जीवनाची प्रकाश वाटच .म्हणुन आपण पणत्या,दिवे लावून ,विद्यूत रोशनाई करून दिपोत्सव साजरा करतो.या दिपोत्सवाला आपण आपल्या सुंदर अशा काव्यरचनेची साद घातल्यास आपल्या अंतर्मनालाही सोज्वळ अशी तेजस्विता लाभून आपण खर्या अर्थाने दिपोत्सव साजरा केल्याचं समाधान लाभेल.

चला तर मग आपल्या काव्यमय रचनने साजरा करुया तेजोमय दिपोत्सव.

 साहित्य प्रकार: कविता.

साहित्य सादर करण्याचा कालावधी: 4 नोव्हेंबर 2021 ते 28 नोव्हेंबर 2021.  

 स्पर्धेचे नियम:                                                                   

1.सदर स्पर्धा फक्त कवितांसाठी आहे.

2.कविता मराठीत सबमिट करता येतील.

3.सहभागींनी त्यांच्या मूळ साहित्य सादर केल्या पाहिजेत. शब्दांचे बंधन नाही.

4.सहभाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

5.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.

6.एखाद्या रचनेबाबत वाद उद्भवल्यास त्यासाठी संबंधित लेखकच जबाबदार असेल.

7.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.

8.स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.

9.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.

10.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.

11.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.          

बक्षीस

सर्वोत्कृष्ट 10 कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु. 200 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे)

⁃ सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येतील.  

निकाल : 20 डिसेंबर 2021

संपर्क: रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड)

मो:9768065763.