Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#"माझे गाव माझी कथा"

SEE WINNERS

Share with friends

गाव हे प्रत्येकासाठी एक जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येक गावाची आपली अशी एक व्यक्तिगत कथा असते.गावात साजरे होणारे सांस्कृतिक उत्सव, रानातील शेतातील काही किस्से, शाळेतील गमती- जमती,नातेसंबंध, मुक्या प्राण्यांवर असणारा जिव्हाळा, तेथील श्रद्धा -अंधश्रद्धा, त्याचबरोबर गावातील लोकांना येणाऱ्या अडचणी अशा सर्व आठवणी आपल्या मनात कुठेतरी दडलेल्या असतात.

अश्या सर्व आठवणींना उजाळा देण्यासाठी स्टोरीमिरर आयोजित "माझे गाव माझी कथा" लेखन स्पर्धा,

चला तर तुम्ही तुमच्या गावच्या आठवणीतील प्रसंग कथांच्या स्वरूपात सादर करा.


स्पर्धेचे नियम -


१.ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

२. सहभागी स्पर्धकांनी त्यांच्या स्वलिखित कथा सादर केल्या पाहिजेत.

३. आधीच्या स्पर्धेसाठी सबमिट केलेल्या कथा पुन्हा या स्पर्धेसाठी सबमिट करू नये

४. तुमची कथा कोणत्याही प्रकारची राजकीय किंवा कोणत्याही धार्मिक समाजाच्या भावना दुखावणारी नसावी याकडे विशेष लक्ष द्यावे.

५. सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक कथा देखील सादर करु शकतात शब्दांचे बंधन नाही.

६. इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.

७. स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेले कथा स्टोरीमिररच्या पोर्टल वरून काढून घेता येणार नाही.

 ८.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल स्टोरीमिरर ने घेतला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.

 बक्षीस

सर्वोत्कृष्ट ५ कथा विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्र व रु.३00 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे)

सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील.


निकाल : २0 मार्च २0२४.


संपर्क : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड.)

9768065763.