Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#" हरवलेले बालपण "

SEE WINNERS

Share with friends

लहानपण देगा देवा! मुगीं साखरेचा राव 


 बालपण म्हणजे निर्मळ झरा... बालपण म्हणजे विश्वास, साधना पूर्तीचा ध्यास, ज्ञानाची पिपासा, जगण्याची उमेद. बालपण म्हणजे आकांक्षा व आशेचे अमर्याद क्षितीज! म्हणून तर म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा,


 खरंच, आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होते. पण बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्‍यात अजुनही दाटलेल्या असतात, त्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होते. आपलं मनही किती विचित्र असतं ना. जेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटते. शाळा सोडुन बाबांसारखे ऑफिसला जावेसे वाटते तर दादासारखे कॉलेजला जावंस वाटतं. मुलींनाही आईसारखी साडी नेसुन स्वयंपाक करायला आणि ताईसारखा नट्टापट्टा करायला आवडतं. 


 फक्त शरीर अन् मनाने मोठे होणारे आपण त्याचा आस्वाद घेणं कधीच विसरून गेलेलो असतो.बाल्यावस्था जरी कायम साथ देत नसली तरी त्यावेळचे अनुभव, प्रेम, खोडसाळपणा हा नेहमी आपल्या संपुर्ण आयुष्यात आपल्या सोबत असतो, सावलीसारखा!  


मात्र आता मोठे झाल्यावर पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं. आता प्रोफेशनलिझमचा टॅग गळ्यात घालून फिरू लागलो. खोड्यांना व मस्तीला मॅनर्सचा विळखा बसला. सिरीयस जगायला लागलो एकदम आणि आयुष्याची मजा गेली! हरवलेय त्यात आपले सुंदर बालपण! 


चला तर आपल्या कथेतून काव्यातून आपण आपले बालपण पुन्हा एकदा जगूयात .




• साहित्य प्रकार: कथा, कविता


 


• साहित्य सादर करण्याचा कालावधी: दि.12 जून 2022.ते 12 जुलै


2022.


 


स्पर्धेचे नियम -


 


1.स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.


 


2.साहित्य फक्त मराठीत सबमिट करता येतील.


 


3.सहभागींनी त्यांच्या मूळ साहित्य सादर केल्या पाहिजेत. शब्दांचे बंधन नाही.


 


4.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक साहित्य देखील सादर करु शकतात.


5.लक्षात ठेवा की तुमची कथा, कविता, आधीच स्टोरीमिरर वर प्रकाशित असल्यास, तुम्ही ती पुन्हा़ सबमिट करू शकत नाही.




6.जर तुमची कथा, कविता आधीच इतरत्र प्रकाशित झाली असेल परंतु अद्याप स्टोरीमिररवर प्रकाशित केली गेली नसेल, तर तुम्ही या स्पर्धेत सबमिट करू शकता




7.एखाद्या रचनेबाबत वाद उद्भवल्यास त्यासाठी संबंधित लेखकच जबाबदार असेल.


 


8.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.


 


9.स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.


 


10.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.


 


11.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.


 


12.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.


 


बक्षीस


* सर्वोत्कृष्ट 5 कथा, व 5 कविता, संपादकीय गुणांनुसार विजेत्या म्हणून घोषित केल्या जातील. आणि बक्षीस म्हणून डिजिटल विजेते प्रमाणपत्रासोबत, ₹ 300 चे स्टोरीमिरर शॉप व्हाउचर देखील दिले जाईल.


 


* सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील.


 


निकाल : 8 ऑगस्ट 2022.


 


संपर्क : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड.)

9768065763.