Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#माझी शाळा माझे विद्यार्थी

SEE WINNERS

Share with friends

शिक्षक व विद्यार्थी जीवन हा एक अतिशय सुंदर प्रवास आहे, ज्यामध्ये माणूस अनेक आव्हानांवर मात करून यशस्वी जीवन जगण्याची कला शिकतो.आणि आपल्या मित्रांसह आनंददायी अनुभव घेताना जीवनाचे मौल्यवान परिमाण सेट करतो. 

शाळेतल्या गमती जमती आठवल्या की आपण स्वतःशीच हसतो.आज मेंदूला ताण देत वर्गातल्यांची नावे आठवावी लागतात.शिक्षक रागवायचे,जास्त चिडले की अंगठे धरायला लावायचे. कधी कधी वर्गाबाहेर काढायचे, पण आजही आपल्या आवडत्या शिक्षकाच्या संपर्कात आपण असतो.

शाळेतलं प्रगती पुस्तकं जपून ठेवलं असेल, कारण शाळेत किती गुण मिळाले होते किंवा उधळले होते हे बघून आजही मनातल्या मनात हसू येतं. शाळेतल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीचा आत्ताचा फोटो बघितल्यावर,"अरे हा कसा दिसायचा ना, आता असा दिसतोय ?" 

शिक्षकांच्या जीवनातील हे क्षण पुन्हा जिवंत करण्यासाठी आणी आजच्या विद्यार्थ्यांना शाळेबद्दल काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी स्टोरीमिररने "माझी शाळा माझे विद्यार्थी" स्पर्धा आणली आहे, ज्यामध्ये शिक्षक व विद्यार्थी तुम्ही सर्वजण तुमच्या जीवनातील आंबट-गोड, आव्हानात्मक, प्रेरणादायी, अविस्मरणीय क्षण कथेच्या/कवितेच्या रूपात व्यक्त करू शकता.


साहित्य प्रकार : कथा,कविता,

साहित्य सबमिट करण्याचा कालावधी: दि : २८ जून ते २७ जुलै २०२३,


स्पर्धेचे नियम -

१.स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे आणि त्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

२. सहभागी स्पर्धकांनी त्यांच्या स्वलिखित कथा,कविता सादर केल्या पाहिजेत.

३. आधीच्या स्पर्धेसाठी सबमिट केलेल्या कथा,कविता पुन्हा या स्पर्धेसाठी सबमिट करू नये

४. ईमेलवर किंवा PDF,हार्ड कॉपी म्हणून किंवा स्पर्धेचा दुवा न वापरता केलेले कोणतेही सबमिशन प्रवेशासाठी पात्र ठरणार नाही.

५. इतर कोणत्याही कवी किंवा लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.

६.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल स्टोरीमिरर ने घेतला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.


बक्षीस :

* सर्वोत्कृष्ट ३ कथा, व ३ कविता, संपादकीय गुणांनुसार विजेत्या म्हणून घोषित केल्या जातील आणि बक्षीस म्हणून डिजिटल विजेते प्रमाणपत्रा सोबत, ₹२५० चे स्टोरीमिरर शॉप व्हाउचर देखील दिले जाईल.

* सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.


निकाल - १७ ऑगस्ट २०२३


संपर्क: रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड)

मो : ९७६८०६५७६३