Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#" स्मृती २०२२च्या आणि संकल्प २०२३ चे "

SEE WINNERS

Share with friends

आठवणी तुम्हाला आतून उबदार करतात.

वर्ष,२०२० आणि २०२१ या दोन वर्षांमध्ये कोरोना नावाच्या महामारीने सारे होत्याचे नव्हते करून टाकले. त्या पार्श्वभूमीवर २०२२ हे वर्ष नवीन ऊर्जा घेऊन आले होते. त्या वर्षाने खूप चांगल्या स्मृती आणि अविस्मरणीय क्षण आपणास दिले.आत्मनिरीक्षण, पूर्वनिरीक्षण, चिंतन, सखोल विचार, आकस्मिकपणे स्मृती मार्गांना भेट देणे - प्रत्येक कृतीमुळे काही आठवणींचा विकास होतो.


नवीन वर्षात आपण नवीन संकल्प घेत असतो आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न देखील करतो.


स्टोरीमिरर सर्व कवी व लेखकांना २०२२ मधील आठवणी आणि या नवीन वर्षासाठी घेतलेले संकल्प व संकल्पांसाठी पडद्यामागील अप्रतिम कथा,कविता शेअर करण्यासाठी आमंत्रित करते.


दरवर्षी तुम्ही स्वतःला बदलण्याचा संकल्प करता. या वर्षी, स्वतः बनण्याचा संकल्प करा


स्पर्धेचे नियम -

१.ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

२. सहभागी स्पर्धकांनी त्यांच्या स्वलिखित कथा,कविता सादर केल्या पाहिजेत.

३. आधीच्या स्पर्धेसाठी सबमिट केलेल्या कथा,कविता पुन्हा या स्पर्धेसाठी सबमिट करू नये

४. सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक कथा,कविता देखील सादर करु शकतात शब्दांचे बंधन नाही.

५. इतर कोणत्याही कवी किंवा लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.

६. स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेले साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.

७. संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल स्टोरीमिरर ने घेतला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.


बक्षीस

* सर्वोत्कृष्ट 5 कथा, व 5 कविता, संपादकीय गुणांनुसार विजेत्या म्हणून घोषित केल्या जातील आणि बक्षीस म्हणून डिजिटल विजेते प्रमाणपत्रा सोबत, ₹२५० चे स्टोरीमिरर शॉप व्हाउचर देखील दिले जाईल.


* सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.


* निकाल : २७ फेब्रुवारी २०२३.


संपर्क: रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड)


मो : ९७६८०६५७६३.