Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#" दिवाळी उत्सव "

SEE WINNERS

Share with friends

स्टोरीमिरर व अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच पुणे आयोजित

        " दिवाळी उत्सव "

   कथा कविता लेखक स्पर्धा


दीप जळत राहूदे, मनाती गैरसमज निघून जाऊदे साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होऊदे  हा दिवाळीचा सण तुमच्या आयुष्यात आनंद,उत्साह द्विगुणित करो.

साहित्य म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा!! म्हणून आपण दिवाळी विशेषांक काढत असतो "तमसो मा ज्योतिर्गमय!!"अंधाराकडून प्रकाशात नेणारा सण म्हणजे दिवाळी होय.

किंवा "नाचू कीर्तनाचे रंगीं ज्ञानदीप लावू जगी!!" असं नामदेवराय सुद्धा वर्णन करतात. दिवाळीच किंबहुना ज्ञानाचा उजेड अंध:कार दूर करा व आपलं मन चांगल्या भावनेने उजळून टाका’, असा दीपकांचा अर्थ आहे. दिवाळीच्या सणातून आपण एकात्मतेची भावना शिकतो.सुख समृद्धी आणि आनंदाचा सण म्हणजेच दिवाळी. या सणाला लक्ष लक्ष दिव्यांच्या झगमगाटानं सारा आसमंत उजळून येतो.म्हणुन आपण पणत्या,दिवे लावून ,विद्यूत रोशनाई करून,दारात रांगोळी काढून दिवाळी साजरी करतो.

भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा सण म्हणजे दिवाळी.असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव वर्धनाचा सण आहे.

या दिवाळीला आपण आपल्या आठवणीतील काही कडू गोड आठवणीं व दिवाळी सणाचं महत्व कथा कवितेच्या माध्यमातून सादर करूया.


स्पर्धेचे नियम -

1.स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

2.कथा,कविता,मराठीत सबमिट करता येतील.

3.स्पर्धकांनी आपली मूळ साहित्य रचना सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धक एक किंवा अनेक साहित्य रचना सादर करु शकतात.

4.स्टोरीमिररवर आधी सादर केलेल्या कथा ,कविता पुन्हा या स्पर्धेसाठी सबमिट करू नये

5.ईमेल किंवा टपाल/कुरिअरद्वारे किंवा स्पर्धेच्या लिंकव्यतिरिक्त अन्य मार्गाने सादर केलेली साहित्य रचना प्रवेशास पात्र नसेल.

6.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.

7.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.

8.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.


साहित्य प्रकार: कथा,कविता

साहित्य सादर करण्याचा कालावधी: दि : 18 ऑक्टोबर 2022 ते 5 नोव्हेंबर 2022,

बक्षिसे :


* सर्वोत्कृष्ट 5 कथा, व 5 कविता विजेत्यांना विजेते प्रमाणपत्र देण्यात येईल

*उत्कृष्ट 15 कथा व 20 ,कवितेंचा स्टोरीमिरर ई-दिवाळी अंक 2022 मध्ये समावेश करण्यात येईल

*सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.


निकाल : 20 नोव्हेंबर 2022


संपर्क: रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड)

मो:9768065763.