Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#शब्द माझे सोबती

SEE WINNERS

Share with friends

शब्द जीवनाची दिशा,शब्दांनीच उजळल्या,विश्वातल्या दाहीदिशा.मनाच्या गाभाऱ्यातील विविध भावभावनांना शब्दांच्या ज्योतीने उजळून लख्ख प्रकाशाचे चांदणे शिंपीत अख्खे आयुष्य उजळून टाकतात असे शब्द जे माझे सोबती बनून आयुष्यभर .....अबोल मूक भावनांना अलंकारिक शब्दांचा सहारा

आपल्या मनातील भाव-भावना आपण साध्या,सोप्या,सरळ,अलंकारीक अशा विविध अर्थाच्या शब्दांनी व्यक्त करीत असतो.शब्द म्हणजे आशा,आकांक्षा,कथा,व्यथा,प्रेम,राग,साथ ,विरह आणि अशाच अजून काही भावनाही .कधी कधी नात्या -नात्यातील स्वार्थीपणा आपल्या लक्षात येत असतो.परंतू शब्दांच तसं नाही.ते तर नि:स्वार्थपणे निरंतर आपल्याबरोबरच असतात.हसतांना,रडतांना,सुखात आणि दु:खातही ते आपली साथ सोडत नाहीत. शब्दांचं भावविश्व फार मोठं आहे. याच भावविश्वातील हवा तो योग्य शब्द वाक्यात गुंफून मनातील भाव आपण व्यक्त करु शकतो. म्हणुनच शब्दांच्या भावविश्वाशी असलेली आपली मैत्री अधीकच घट्ट करु या.लेखणी हाती घे

ऊन आपली स्वप्ने,कल्पना,आकांक्षा,इच्छाअन सार्या भावना शब्दांनी साकारु या.

चला तर मग आत्ताच आपली लेखणी उचलून, "शब्द माझे सोबती" या स्पर्धेत सहभागी होऊया 

  स्पर्धेचे नियम -

1.स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. सहभागी आपल्या आवडत्या विषयावर कथा,कविता सादर करू शकतात.

2.कथा,कविता, मराठीत स्वीकारल्या जातील.

3.कोणतीही शब्द मर्यादा नाही

4.सहभागींनी त्यांच्या मूळ साहित्य सादर केल्या पाहिजेत.

5.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.

6.एखाद्या रचनेबाबत वाद उद्भवल्यास त्यासाठी संबंधित लेखकच जबाबदार असेल.

7.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.

8.स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.

9.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.

10.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.

11.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असल.

बक्षीस :

सर्वोत्कृष्ट 5 कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व स्टोरीमिररकडून प्रकाशित झालेली तीन पुस्तके (दोन मराठी व एक हिंदी ) दिली जातील

सर्वोत्कृष्ट 5 कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व स्टोरीमिरर कडून प्रकाशित झालेली तीन पुस्तके (दोन मराठी व एक हिंदी ) दिली जातील

सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र व रु.100 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मेल द्वारे देण्यात येतील.

निकाल :25 जानेवारी 2022 .

संपर्क : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड.)

मो : 9768065763.