Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#गौरव मराठी भाषेचा

SEE WINNERS

Share with friends

'मातृभाषा मराठी ' या दोन शब्दात मातेची ममता असल्याचे लक्षात येते.ज्याप्रमाणे आई लहानपणापासून मुलांचं संगोपन करतांना प्रेमाने तर कधी रागावून आपल्या मुलांवर सुसंस्कार करीत असते त्या प्रमाणेच सर्वांग सुंदर अशी आपली मराठी भाषा कोमल तर प्रसंगी वज्राहून कठोर होत असली तरी तिची कठोरता सुध्दा आपणास सन्मार्गाची वाट दाखवण्यास उपयुक्तच ठरत असते. 

' माझ्या मराठीचे बोलू कौतुके

 परी अमुताते पैजा जिंके ' अशा गोड,मधूर शब्दात संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीची थोरवी गायलेली आहे.


आपली संस्कृती आणि परंपरा आपल्या मराठी भाषेमुळेच जोपासली जात आहे.अशा या भावगंगेतील मराठी बाण्याचे ज्ञानभंडार असलेली मातृभाषा मराठी आपणा प्रत्येकासाठी वैभव असून भुषणावह आहे. 

  चला तर मग आपणही आपल्या साहित्यातून माय मराठीला गौरवू या .


स्पर्धेचे नियम -

१. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

२. साहित्य सबमिट करताना टॅग मध्ये #मराठी भाषा दिन असे लिहावे.

३. स्पर्धकांनी आपली मूळ साहित्य रचना सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धक एक किंवा अनेक साहित्य रचना सादर करु शकतात.

४. स्टोरीमिररवर आधी सादर केलेल्या कथा ,कविता पुन्हा या स्पर्धेसाठी सबमिट करू नये

५. ईमेल किंवा टपाल/कुरिअरद्वारे किंवा स्पर्धेच्या लिंकव्यतिरिक्त अन्य मार्गाने सादर केलेली साहित्य रचना प्रवेशास पात्र नसेल.

६. संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.

७. या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.

८. स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.


साहित्य प्रकार: कथा,कविता


साहित्य सादर करण्याचा कालावधी: दि : २५ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३



बक्षिसे :


* सर्वोत्कृष्ट ५ कथा, व ५ कविता विजेत्यांना विजेते प्रमाणपत्र देण्यात येईल.


* उत्कृष्ट १५ कथा व २० ,कवितेंचा स्टोरीमिरर ई पुस्तक बनवण्यात येईल.


*सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.


निकाल : १० एप्रिल २०२३,


संपर्क: रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी विभाग प्रमुख)


मो: ९७६८०६५७६३.