आधार
आधार
आधार कोसळला अन् मी जागा झालो
वास्तव जीवनाचे मला आता कळु लागले
नव्हती तमा अंधाराची,
न होती भिती वादळाची,
तो होता म्हणूनि,
न होती घालमेल मनाची
उरात होती धगधगती आग,
चैतन्याची होती उगवली पहाट,
तो होता म्हणूनि,
होती उमेद मनात
आता तो नाही म्हणूनि,
खचलो आहे, विखुरलो आहे
क्षणार्धात काळाचा घाला झाला,
अन् मी चितपट झालो
पण मला उठावे लागणार आहे,
झगडावे लागणार आहे
नियतीला या सडेतोड उत्तर,
द्यावे लागणार आहे
मला झुंजावे लागणार आहे,
मला लढावे लागणार आहे,
आहे ते पदरी सांभाळून,
मला आयुष्य घडवावे लागणार आहे