आज लग्नाचा वाढदिवस
आज लग्नाचा वाढदिवस
सकाळी सकाळी एकाला आठवल
आज 25 वर्षापुर्वि आमच लग्न झाल
हळू हळू शुभेच्छांचा पाऊस पडला
आम्ही दोघ जे विसरू पाहत होतो तो दिवस
सगळे मुद्दामच आठवण करून देऊ लागले होते
तेव्हाही इतरांनीच साजरा केला होता सोहळा
आजही तेच --
का लोकांना दुस-यांच्या जख्मांवर मीठ चोळायला आवडत
जी चूक इतकी वर्ष भोगतोय त्याच कुठे सेलिब्रेशन असत ??