Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Padmakar Bhave

Others

5.0  

Padmakar Bhave

Others

आस

आस

1 min
215

तुला बाहुपाशात घट्ट आवळतांना,

विझत जातात माझ्यातल्या माझ्या अस्तित्वाच्या सर्व खुणा;

विझतात तुझ्या विरहाच्या आर्त हाका,

तुझ्या मुक्त कुंतलांतून 

मी विहरत असतो-तुझ्या सहित !

आणि तू ......

तू विरघळलेली असतेस माझ्याही आधी!

तुझ्या चांदण देहावर उरलेल्या असतात

माझ्या मनीच्या विहग चोची !

एक तृप्त अतृप्तता....!

मला साद घालू लागतात....

तुझ्या शब्दांचे लाघव पक्षी !

तू अलगद उतरू देतेस -

माझ्याही खगांना तुझ्या डहाळीवर !

वसंत गीतात आपण चिंब भिजत जातो,

तुझा वसंत गंध भिनत जातो

माझ्या अंतर्मनात ..तुझ्या देहसेतूवरून ! मला साद घालत जातात...

तुझ्या अर्धोन्मिलीत क्षुधार्त लोचन कडा!

अश्या तरल क्षणी मी चातक असतो

लक्ष चोचिंचा... आणि तू....

 तू असतेस पाऊस.. लक्ष धारांचा !

Rate this content
Log in