Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gaurav Daware

Comedy Drama

3  

Gaurav Daware

Comedy Drama

अदभूत विमान

अदभूत विमान

1 min
207


एके दिवशी गावात घडली गोष्ट चमत्कारी

तो चमत्कार पाहून लोक झाले वेडे अवतारी

चमत्कार होता साधा अन अदभूत अलंकारी

लोक झालेत स्तब्ध पाहून घटना मस्त सारी


गावातले लोक होते मस्त कष्ट कामकरी

गुंतून होते आपल्या कामात पहाटे लोक सारी

तेवढ्यात गावात आल एक गोल विमान थोडं भारी

गावकरी पाहत राहिले बनून स्तब्द सारी


ते गोल विमान होत हवेत उभ अलंकारी

अन आला त्यातून पांढरा प्रकाश अवतारी

लोक पाहून घाबरले ती घटना अदभूत सारी

काही पोट्टे माराले लागले त्याले दगड अन तारी


तेवढ्यात त्या प्रकाशातून गोष्ट घडली चमत्कारी

विमानातून उतरला एक कुत्रा गोंडस भारी

त्याच्या कडे पाहून काही म्हणे हा आहे देव अवतारी

तर काही लोक म्हणे हा भूत आहे भयानक भारी


ते विमान कुत्र्याले सोडून निघून गेल पटकन वाणी

काही लोक त्याच्याकड पाहत राहले अलवारी

काही लोक म्हणे हा नक्की देव आहे चमत्कारी

आपले दुःख दूर करायला तो आलाय भूमीवरी


त्याले देव म्हणताच बायकांनी त्याले मानलं गिरीधारी

ओवाळली त्याची आरती अन लावला टीका मस्तकी सारी

कित्येकांनी आणलं त्याच्यासाठी जेवण मस्त भारी

तर काहींनी बांधलं मंदिर बनून कलाकारी


आज त्याची गावात होते पूजा रात्र-दिनवरी

कित्येकजण त्याला मनतात अदभूत अविष्कारी

काही लोक त्याच्या फोटोच लॉकेट घालून फिरतात जगभरी

पण आजही काही विरोध करतात बनून स्वतः टीका कारी


आज त्याची किर्ती पसरलीय जगभरी

लोक दुरून दुरून येतात त्याच दर्शन घ्यायावरी

लोक दक्षिणा देतात बनून मस्त अमीर सारी

म्हणून गाव झालंय अमीर फक्त त्याच्या कृपेवरी

गाव झालंय अमीर फक्त त्याच्या कृपेवरी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy