Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

अपहरण भावनांचे...

अपहरण भावनांचे...

1 min
202


आयुष्याच्या लांबचलांब कतारी,

साध्य करायचे खुप काही,

असमाधान इथे पावलोपावली,

'कारण ' ही विषमता आहे ठायी ठायी,

काय? ही परिस्थिती आणि,

काय? ही सताड उघडी कटूस्थिती ...

विश्वास नाही आता हातावरच्या रेषेवरही ,

लिहीत चालले दैव काही,

स्वप्नाच्या गाठोड्या बांधुन ठेवल्या,

पणाला लावले सर्वही,

तरी कुठे आपल्याजवळ वाशिला,

आपली पाळी येताच धावत येतो कोणी,

कागद दाखवत समोर गेलेला,

आपण मात्र हूज्जत घालीत तेथेच,

काय? ही परिस्थिती आणि,

काय? ही सताड उघडी कटूस्थिती ...

अज्ञात हल्ला चढवला मनावर,

अपहरण केले भावनांचे आपल्या,

आता तेच बोली ठरवतील आणि,

आपण सोडवत बसायचे हवी तेवढी रक्कम देऊन,

पण ऐपत आहे का? आपली,

की राहू द्यायचे भावनांना बंधिस्त,

सांगुन पाहूया त्यांना,

नाही हो, खरंच नाही माझी ऐपत ,

माझ्या भावनांना शब्दरूप दयायची ,

तुम्हीच ठेऊन घ्या कायमचे,

मी मात्र दोष देत राहील,

काय? ही परिस्थिती आणि,

काय? ही सताड उघडी कटूस्थिती ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract