Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

.प्रमोद घाटोळ

Others

3  

.प्रमोद घाटोळ

Others

असा मी वसंत

असा मी वसंत

1 min
320

यौवनातील आठवणींच्या , गुंफीतो कशिद्यात तारा

तनू वरच्या सुरकूत्यांचा ,असा मी वसंत कोरा

गुलाबी तारूण्य माझे , वृद्ध वयात गेले ढळूनी

रंग गुलाबाचा राहला , तसाच गाला वरती चढूनी

खळखळून हसतांना , ओठांवर उडती थरारे

आवाज तसाच मंजुळ आहे , गातांना फिरती भरारे

आठवणीतले ऋतूही अजूनी , माझीच वाट पाहे

कंबर कमानी जरी वाकली, पण मर्दानी थाट आहे

पांढरे केस भासे जणू की , परसातला श्वेत चाफा

गोड त्या मैत्रीचा मी ,कधीही नाही तोडला वाफा

आजही मोह तिला पण होतो, लाजते गोड हसूनी

राखिते नजर सारखी अन् न्याहाळते दूर बसूनी

( अभिनेता स्वर्गीय देवानंद यांना समर्पित रचना )

Rate this content
Log in