बोल मराठी......
बोल मराठी......
बोल मराठी,
मोल मराठी,
ती पंचप्राण
तोल मराठी ।।१ ।।
वैभवी शान
देवू सन्मान,
संपन्नतेचा,
वारसा छान ।। २ ।।
उंचावू स्थान,
ठेवूनी भान,
बावनकशी,
सौंदर्य खाण ।। ३ ।।
स्वराचा भार,
अपरंपार
नखशिखांत,
करी शृंगार।। ४।।
देऊनी झुंज,
जिंकुनी पैंज,
ज्ञानभाषा ही
मानाची चीज ।। ५ ।।
संतांचा त्याग,
भक्तीचा राग,
दऱ्याखोऱ्यात
ओवीची जाग ।। ६।।