चोरून बघताना
चोरून बघताना
तुला चोरून बघताना
खूप छान वाटते
तुझ्या मागे फिरायला
मला फिरावंसं वाटते
तोंडून शब्द पडताना
बोलणं एेकावंसं वाटते
तुझ्या जवळ बसताना
मिठीत घ्यावंसं वाटते
निरागस हसण्यातुनी
तुझ्याकडे पाहावं एकटक
तुझा हात पकडून
सोबत चालावं टपटप
तुझ्या जवळ राहून
चेहरा मनात भरावंसं वाटतं
तुझ्या सोबत खूप
गोड बोलावंसं वाटतं