दानधर्म
दानधर्म
1 min
674
करा दानधर्म / नको मनी हाव/
नको भेदभाव/ माणसात//१//
असावा जिव्हाळा/जुळावित नाती/
नको धर्म जाती/जीवनात//२//
दीन दुबळ्याला/ करुनी मदत/
द्यावा एक हात/ आधाराचा//३//
नाही कुणी संगे/ घेऊन रे जात/
सर्व मिळकत/ मेल्यावर//४//
राखुनीया मान/ठेवावा आदर/
करावी कदर/ सकळांची//५//
नाशवंत देह/सरते शेवटी/
सरणात पेटी/निपचिप//६//
करुनिया दान/ आपल्या देहाचे/
सार्थ करायचे/ हे जीवन//७//
बुडत्याला मिळे/काडीचा आधार/
नाही राहणार/निराधार//८//
नाही जात वाया/केला दान धर्म/
केले पुण्य कर्म/आपणही//९//
मिळेल रे शांती/ सुख समाधान/
मान नि सन्मान/भुमीवर//१०//