धर्म?
धर्म?
देवळे नि मशीदीत रमली सरकारे
कोपऱ्यात चौकातल्या कुणी कुडकुडत होता
अच्छे दिन नारा शेकडो कॅमेऱ्यात गर्जत होता
अंधारात कुणी शेतकरी फासावर लटकत होता
सर्व समान शिक्षणाचे अभियान राबत होते
गळकया छताखाली विद्यार्थी
पाऊस थांबायची वाट पहात होते
समान संधी स्त्रीयांना प्रवाहात आणणार होती
काळोखात तिच्याच देहाची बोली लागत होती
कामगार युनियन लढत होती
संकटसमयी जथ्थयाने वनवासी फिरत होती
तिच्या न्यायासाठी राने पेटली होती
जात समजली तेव्हा अपसुक
अट्रासिटीवर सोडुन तिला गर्दी पांगली होती
सर्वधर्म समभाव माननारे राष्ट्र
हे दुनिया मानित होती
धर्मांचे शिरच्छेद करून
पेटविलेले जिवंत दगड पाहुन
मात्र लज्जास्पद घृणेने हसत होती