ध्येय
ध्येय
घनदाट जंगलात
गहाळच झाला रस्ता |
ध्येय दिसेनात झाले
हरवला माझा बस्ता ||१||
ध्येय कसा गाठू आता
नाही माझ्यात रे बळ |
कसा समोर मी जाऊ
वाटे तिथे मृगजळ ||२||
मनी वाटे पोहुन मी
पार पाडू मार्गक्रम |
गाठू लवकर ध्येय
तोडू सर्वाचे विक्रम ||३||
ध्येय गाठतांना जरी
कैक संघर्ष येतील |
पहा होईन यशस्वी
लोक सर्व जळतील ||४||