गौरी पूजन
गौरी पूजन
गौरी आणल्या
प्रत्येक घरात
भावना मनात
दृढ जाहल्या ...
घरी कुणाच्या
उभ्या त्या राहिल्या
खड्यांच्या पुजिल्या
कोकणस्थांच्या ...
छान आसन
केले सुशोभित
असे सजवित
दिपे नयन ...
सुंदर साडी
दागिने घातले
कसे सजवले
भरली वाडी ...
केले पुजन
आरती म्हटली
प्रसंन्न जाहली
ती मनोमन ...
रूप सुंदर
भान हरपले
तल्लीन जाहले
सरे अंतर ...
केला प्रसाद
घावन घाटले
जन ते जमले
घेत आस्वाद ....
मनात वाटे
असेच दर्शन
समोर नर्तन
भावना दाटे ....
गौरी देवता
घालू लोटांगण
ठेंगणे अंगण
मनी शांतता ...