गोपाल काला
गोपाल काला
श्रावण मासा वद्य अष्टमीस
श्रीकृष्ण मथुरेत प्रकटले
धन्य झाले वसुदेव ,देवकी
कंसापासुनी त्यास लपविले ||१||
करते साजरी जन्माष्टमी
पौराणिक असे ही प्रथा
साजरा करतात उत्सव
गोपालकाल्याची कथा ||२||
दहीदुधाने भरलेला हंडा
गोविंदाचा साहसी खेळ
मानवी मनोऱ्यावरून
मडके फोडण्याचा मेळ ||३||
गोविंदा आला रे गोपाला
गोकुळात आनंद झाला
गित गातात लहान -थोर
साजरा करी गोपालकाला ||४||
थरावर थर ते लावूनी
करती जीवाशी करार
बांधूनी उंच दहीहंडी
बोली लावती हजार ||५||
माने विष्णूचा आठवा अवतार
श्रीकृष्णाचे करुनी स्मरण
बाललीला ,नीती ,प्रेम ,त्याग
या सर्वां आपण करू नमन ||६||