Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

गूज अधरी

गूज अधरी

1 min
208


अवखळ अल्लड , गूज मनीचे

गूज अधरी , ओठांवरी अडते (ध्रु)


नजरानजरी , होता नकळत

पापण्यांची महिरप , जाते झुकत

कसे सांगू तुला , शब्द ना उमटे

गूज अधरी , ओठांवरी अडते (१)


भाव मनीचे , लाजरे गोजिरेसे

नयनांतूनी जणू , तू टिपलेसे

लाज बावरी , लालिमा पसरते

गूज अधरी , ओठांवरी अडते (२)


प्रतिक्षेत मीलन , प्रेमी जीवांचे

अधीर सखया , वेडच प्रेमाचे

प्रीत अव्यक्त , मजलागी सलते

गूज अधरी , ओठांवरी अडते (३)


मला वाटते , सखया रे मिळूनी

गूज बोलावे , निवांत कुंजवनी

तरुवेली साक्षीला , धुंद एकांते

गूज अधरी , ओठांवरी अडते (४)


येशील सजणा , कधी मजसवे

प्रीत प्रीतीलागी , जीवाशिवासवे

तरुवेली साक्षीला , धुंद एकांते

गूज अधरी , ओठांवरी अडते (५)


येशील सखया , कधी मजसवे

प्रीत प्रीतीलागी , जिवाशिवासवे

भावनांना गुंफुया , शब्दरुपाते

गूज अधरी , ओठांवरी अडते (६)


अवखळ अल्लड , गूज मनीचे

गूज अधरी , ओठांवरी अडते (ध्रु)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract