गूज माझे
गूज माझे
गूज माझ्या अंतरीचे उघड मी बोलू कसे,? ..
गूढ जे माझे मला ते उलगडू सांगा कसे?
चालते मी बोलते मी चार चौघी सारखी. ...
तीच का तू कालची आरसा हसूनी पुसे.
बाग नाही मोगर्या ची भोवताली गंध येतो.
उमलते भोळी कळी साद देती कवडसे.
ऐकीले ना शब्द ज्याचे गीत ते मी आळविते.
अंग झाले मोरपीस लागले मजला पिसे.
भास की हा ध्यास आहे यौवनातील आस ही.
जादू ही त्याची असे ग अंतारि माझ्या वसे.