Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jayshree Munde

Comedy

4.5  

Jayshree Munde

Comedy

केसांची रंगपंचमी

केसांची रंगपंचमी

1 min
470

दिसला ग बाई दिसला 

डोक्यात पांढरा केस दिसला

त्याला बघून जीव माझा 

झुरला ग बाई झुरला

वय झालं आता म्हणून 

जीव चिडला ग बाई चिडला

कोणाला कळू नये म्हणून

लाजून डोईवर पदर मी घेतला ग बाई घेतला 

आरशात सतत मी डोकावून 

पांढऱ्या केसाला हमेशा 

पाहिलं ग बाई पाहिलं

गान गुनगुनंने मी आता 

सोडलं ग बाई सोडलं

कलपांची रंग पंचमी 

खेळून केसांना लावून लावून

थकले ग बाई मी थकले

मुळा जवळचा रंग 

आठ दिवसांनी 

गेला उडून ग बाई गेला उडून

कलपाची रंग पंचमी

आवडेना ग बाई मला आवडे ना

काय करावे काही कळेना ग बाई मला कळेना

कलपाच्या रंगपंचमीची अशी फटफजिती झाली ग बाई झाली

Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy