Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Others

4.5  

Sanjay Raghunath Sonawane

Others

कोरोना गीत (corona)

कोरोना गीत (corona)

1 min
23.8K


लई झाल थैमान कोरोनाचे,

लई अती झाले ह्या विषाणूचे 

आता ह्या कोरोनाच्या आजाराला 

सर्व मिळून गाडायचे 

लढा आपण सारे देऊ 

कोरोनाग्रस्ताना जीवदान देऊ .


केला विनाश मानवाचा,

वायरस पसरला जगभर त्रासाचा 

सापडले सारे जग मरणाच्या खाईत

अती भयंकर महामारीच्या चक्रव्युहात 

ह्या कोरोनाच्या भयंकर विळख्यात .


धडाधड मृत्यूचे तांडव,

सडे पडले धरतीवर 

सार्या जगाला सतावले 

सार्या मानवाला रडवले 

आता नाही ह्याला रे सोडायचे 

कायमचे पळवून लावायचे .


लावा शिस्त स्वताःची स्वताःला 

अनमोल जीव वाचविण्याला 

सुख,शांतीने जगायचे,

सारे मतभेद विसरायचे 

मदत करा सारे जन 

होवू द्या सर्वांची एकत्र मन .


आधार द्यारे गरीबांना 

आधार द्यारे कोरोना ग्रस्ताना 

कोरोनाची दहशत संपवू 

पुन्हा विजयी होवू  

पूर्वी सारखे चैतन्य आणू.


कोरोनाला आपण हरवू 

अंत करोनाचा करू  

सार्या जगाला वाचवू 

सार्या मानवाला जगवू 

आपणच सर्व जिंकू.


निघू नका घराच्या बाहेर 

वेळ सांगून नाही येणार 

जीव अनमोल आहे खरं 

आयुष्य होइल क्षणभंगूर 

रक्षण करा खरोखर .


कायदा सरकारचा पाळा 

शिस्त स्वताची स्वताला लावा 

आता सर्वांनी देशाला वाचवा

कोरोनाला सर्व मिळून हरवा 

जीव स्वत:चा स्वत: वाचवा.


Rate this content
Log in