Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Dhangawhal

Others

4  

Sanjay Dhangawhal

Others

कष्टकरी शेतकरी

कष्टकरी शेतकरी

1 min
24.4K


कष्ट करून घाम गाळून 

शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा

कोणालाच कळत नाही

म्हणून तो काही माती कसायच सोडत नाही

उजाड पडल की शेतकरी

औत खांद्यावर घेतो

मोठ्या डौलानं

शेताच्या वळणावर जातो

संगतीला हैब्या गैब्याही त्याच्या आंगेमांगे घोळत असतात

रानपाखरे त्याच्या 

पुढे पुढे पळतं असतात


 संकटे आल्यावरही

 शेतकरी कधी घाबरत नसतो

मोडला पायात काटा

तरी चालतचं राहतो

रखरखत्या ऊन्हातही अनवाणी चालताना

चेहऱ्यावरच हसु ढळू देत नाही

तापलेल्या मातीचा चटका

कळजापर्यंत पोहचू देत नाही

वादळ वाऱ्याला तो अशीच फुंकर मारून पळवतं असतो

लाडावलेल्या पिकांना लेकरावानी जपतो


तेव्हा शेतकऱ्याने  शेतात पाय ठेवताचं

मातीला तरारी येते

चिखलात पाय रूतल्यावर

पिकांना उभारी येते

शेतातलं बुजगावनही लई भारी भरायला लागतं

मुद्दामहून पाखरांवर डोळे वटारतं


पाटावरच पाणी सुध्दा

आनंदाने ईकडे तिकडे

खळखळ पळतं असतं

पायाला गुदगुल्या करून

शेतकऱ्याला हसवतं असतं

मग मातीत शिरणाऱ्या पाण्याला पाहून

तो ही गुणगुणायला लागतो

मातीचं डोहाळं 

डोळे भरून पहातो 


तेव्हा घामा मातीने मळलेल्या शेतकऱ्याला

वारा हळूच गारवा देते

आभाळात सैरभैर झालेल्या पाखरांना

दुर दुर नेते

मावळतीचा सुर्य जेव्हा त्याला मिठी मारतो

तेव्हा थकलाभागला देह घराकडे नेतो


Rate this content
Log in