कविता
कविता
सागराची खोली ।
व्यक्त व्हाया ओळ ।।
सारा ताळमेळ ।
कवितेचा।।
जे न देखे रवी।
पहातसे कवी।।
सारी अपूर्वाई।
कवितेची।।
गद्याचा पसारा।
उताऱ्यांचा भारा।।
कडव्यांच्या धारा।
कवितेच्या।।
विचार सागर।
केवढी घागर।।
सामावले सार।
कवितेत।।
आईच कविता।
पुरविते लाड।।
पोर मीच गोड।
कवितेचे।।