माळरान
माळरान
1 min
866
माळरान झाले कसे
आज इतके ओसाड
विसावण्या नाही तेथे
शेष एकही रे झाड
पाहतांना दुरवर
दिसे डोंगर उजाड
नाही शीतल गारवा
वारा उष्ण हा उनाड
करू सारे भटकंती
रानोमाळ देऊ भेट
सोबतीला घेऊन बी
लाऊ डोंगरात थेट
हिरवळ चोहिकडे
मृग नक्षत्री दिसेल
पाहतांना साज सारा
आभाळही बरसेल