माणसात मी
माणसात मी
देव तीर्थामध्ये नाही
माणसात मी पाहतो
माणसाच्या हृदयात
कार्यरत तो राहतो
नरजन्म माणसाला
बहू भाग्याने मिळाला
विसरून उपकार
कसा कृतघ्न तो झाला
माणसात 'मी' घुसला
देवापेक्षा मोठा झाला
माझे माझे म्हणताना
अंतकाळ बघा आला
पैसा पैसा जमा केला
तरी संगे नाही नेला
रित्या हातीच जन्मला
रित्या हातानेच गेला
दिले देवाने एवढे
तरी आणखी मागतो
पशू नाही पक्षी नाही
तरी तसा का वागतो
गुणसंपन्न एखादा
जगामध्ये सापडतो
असा विरळा माणूस
माणसात मी शोधतो