Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Others

3  

Manisha Wandhare

Others

महाराष्ट्र माझा सांगणे बोलणे ऐकणे...

महाराष्ट्र माझा सांगणे बोलणे ऐकणे...

1 min
3


सह्याद्रीच्या पायथ्याशी ,

मौसमी वारे उंची गाठती,

ओलावते मग माती इथली,

हिरवळ लेवुनी धरती नटली ...


छत्रपती शुर शिवरायांचे ऐकुनी स्पंदने,

माती महाराष्ट्राची कपाळी लावुनी वंदने...

महाराष्ट्र ,महाराष्ट्र माझा सांगणे बोलणे ऐकणे...


उधाणतो समुद्र अरबी ,

सरी बरसता झुळझुळ वाहती,

गोदावरी कृष्णा कावेरी ,

इथुनी सारी उगम पावती ...


थोर संत तुका ज्ञाना मुक्ताईच्या ओव्या वाचने,

साक्षरतेचा ध्यास घेऊनी सावित्रीस शिकणे ...

महाराष्ट्र ,महाराष्ट्र माझा सांगणे बोलणे ऐकणे...


उंच उंच डोलती डोंगर रांगा ,

कळसुबाईचा मोर पिसारा,

जैवविवीधतेला देऊनी थारा,

असा सुंदर सखोल पसारा ...


माय मराठी महाराष्ट्राची मंजुळ बोलणे ,

माणसांनो प्राणीमात्रांशी माणसासारखे वागणे ...

महाराष्ट्र ,महाराष्ट्र माझा सांगणे बोलणे ऐकणे...



Rate this content
Log in