Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

siddheshwar patankar

Comedy

3  

siddheshwar patankar

Comedy

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

1 min
1.8K

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

पण आपल्याला रोलच कधी मिळाला न्हाय

"अय साला" करून, डिट्टो करतो हाणामारी

स्टाईल आपली बघून येड्या होतात साऱ्या पोरी

बिग बी ची अॅक्टिंग म्हणजे खाऊ वाटलं काय

उंची सोडली तर बाकी इथं सर्व ठीक हाय

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

पण साला तसा रोलंच मिळाला न्हाय

शहेनशहा बनून बाहेर पडलो एका काळ्याभोर रात्री

चमकणारा हात बघून लागली भरपूर मागे कुत्री

लटपट लटपट धावत होतो जणू अग्निपथावरती

जंजीर धरुनी दिवार चढलो मग पडलो तोंडावरती

तोंड फुटुनी पार सुजले, आला गळ्यात माझ्या पाय

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

पण काय करू, आता पाय गळ्यात आलाय भाय

नायतर नक्की बनलो असतो बिग बी भाय

Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy