Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

कदम. के.एल.

Crime

3  

कदम. के.एल.

Crime

मी सामान्य माणूस

मी सामान्य माणूस

2 mins
338


मी एक सामान्य माणूस मी रोज एक गुन्हा करतो

मी घरातून उठून कोणत्याही गावात फिरतो

सरकारी ऑफिसात कागद पञ घेवून

सुद्धा मी माझ्या मौलिक अधिकाराप्रती दक्ष

आणि खंबीर राहण्यास घाबरतो


हो मी मुर्ख आहे हे सिद्ध होण्यास

काडीचा वेळ लागत नसतो

माझे पोटार आणि प्रेम दुसर्याच्या मड्यावरही 

जगण्याची हालकट वासना देतो


त्यासाठी मी सिमा बाह्य संस्कृतीच्याच काय

अंतरगत संस्कृतीचिही लय लुट करतो

माझ्या पोटातले आताड मला 

लोकांवर निर्बध उठवण्यास लादण्यास सांगतो


मी अज्ञानाचा पुतळा आहे आणि माझे अज्ञान

तुमच्या ज्ञानातले अज्ञान काढून विरोधात उभा असतो स्वतंञ स्वावलंबी असणे तुमचा अधिकार होता

तो टिकवण्यास मी कटिबद्ध नसतो


माझे वर्तन तसाच शब्द फक्त स्वार्थाधिन झालेला असतो

मग तो कोणापुढे मांडतो याच्यात संभ्रम नसतो

मला सर्व घटकांचा चटका नको वाटतो

मला मी आणि माझ्यातला अहंम प्रथम सर्वश्रेष्ठ वाटतो


ईतर श्रेष्ठ आणि जेष्ठ कसली जगण्याची रित देवून व ठेवून गेलेत

त्याचे ओझे एकदम माझ्या पाठी वर घेण्यास मी इच्छुक नसतो

घेणार तर वाटत नाही पण तो लादणारा पण असा आहे कि फण काढल्या शिवाय जगत नसतो


मी कर्तव्य निष्ठ राहण्यापेक्षा कर्तव्यातून स्वार्थ

स्वार्थामध्ये काय त्यागामध्येही अर्थ घेत असतो

त्याग मला राग काढायला लावतो

तर राम राम मला राग सोडायला लावतो


माझे स्वामित्व कोणीही घेवू इच्छुक असेल तर

त्याने माझ्या अटीतून जाणे गरजचे आहे असे ठणकावूनच सांगतो

ठणकावूनच दाब दिवून सांगतो

मी सुंदर नसलो किंवा मी स्वबळसबलसक्रिय नसलो तरी

माझे माझे माझे मी जाणतो तिथेच मी ईतरांची स्वायत्त हक्क फेटाळतो

मी रोजच एक गुन्हा करतो 


मी डांबरी सडकेने चालून वाहन धारकाचे हक्क चिरडतो

कधी ट्रैन खाली जिवंत जीव दिवून तिचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतो

चांगल्या पोषक पुरक योजनामध्ये बाधा आणून माझे कटुप्रदर्शन आणि कटु स्वार्थ मी कटुतेने किंवा ममतेने बळकवण्याचा अक्षयअक्षम्य हेतुपरस्पर गुन्हा करतो

माझी संस्कृती आणि कला मी जगलो तर जगेल असे मानून मी जगण्याच्या शर्यतीत धावणार्यांसोबत धावून मी त्यांचे परिश्रम वाढवतो

मी सामान्य माणूस मी रोजच एक गुन्हा करतो !

झाडे लावण्याचे महत्व सांगतो आणि लोकांची हाडे झिजवतो

साधी भोळी माणसे मला माझ्या स्वार्थाचे सहसंजीवक सार्थी वाटतात!


त्यांचे बल आणि हलाहल मी तर वाढवत नाही असे मी अमान्य करतो

आणि इतरांच्या प्रेमळ भावनांचे भावशून्य बनवतो पण मी त्यांच्या भावनां पुरक 

वर्तन आणि समर्पण करणे टाळतो कातर कुठे वेळेचे आणि नितिमतेचे माझ्या त्यागाने

संवर्धन होईल असे कळकळीने जाणतो

मी सामान्य माणूस मी रोजच एक गुन्हा पुन्हा पुन्हा करतो


मी प्रांत बनवून तिथे वर्चस्व गाजवतो अति शोक्ती होईल मी तिथूनही फुटून तो प्रांत आणि हा प्रांत अशा प्रांतीक भौतिकवादातूनही सरकारचे 

अर्थआपत्तांष्ठानाही मिळावे याकरिता कणखर आणि सहप्रदर्शक होतो माझी जैविक कुटिलतेला या सतविवेकास अमान्य करण्यास जबाबदार धरतो

अज्ञानाचा वारसा झुगारतो आणि जसे तसे जमेल तसे माझा काय समाजाचाही रक्षणहार कसा होईल अशी भावना घेवून पुढे सरकलेल्यांबरोबरच कुलघोडी करून समाज पुढे ढकलण्याच्या अपचिकित्सकतेलाही योग्य समजतो

मी सामान्य माणूस मी रोज एक गुन्हा करतो 


ज्ञानाला वय नसते तर माणसाला वय असते ज्ञान म्हणजे मनामध्ये असलेले स्वप्न आणि घर चालवताना होणारे अब्रेचे खोबरे किसता किसता मी मानवतावाद सोडतो आणि बरेच वाद घालतो 

मी सामान्य माणूस मी रोज एक गुन्हा करतो !



Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime