Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Romance

4  

Manisha Wandhare

Romance

मन फुलपाखरू...

मन फुलपाखरू...

1 min
5


बोटावरती ठेवून रंग ,

कुण्या फुलाच्या मोहात दंग ,

भिरभिर उडते वाऱ्यावरती ,

मन फुलपाखरू उडण्याचा छंद ...

रंग कोणता यास आवडे ,

हे मनाचे कोणते सोहळे ,

उधळे रंग बेभान होऊनी ,

रंगात रंगुनी दिपले डोळे ...

मखमली सुंदर पंखावरती ,

स्वप्न किती किती खेळती ,

फुलांच्या मागे दुडदुड पळती ,

जणू मन फुलपाखरू उडती ...

भार स्वप्नांचा अलगद उचलतो ,

पंखावरती लेऊनी रंग ,

जीवनाचा पिसारा फुलवतो,

हसण्यावारी नेतो दुःखाचा संग...

बोटावरती ठेवून रंग ,

कुण्या फुलाच्या मोहात दंग...


Rate this content
Log in