मृगजळ
मृगजळ
केला बाई स्त्री हट्ट
तिने मोठ्या घराचा
मुलगा शिकावा हाच
अट्टाहास होता तिचा
चार पैसे ठेव जरा
असेन मी पेन्शनर
लक्ष तिने दिले नाही
ठाम राहे घरावर
वर्ष महिने सरले
सर्व वाटे मनासारखे
स्नुषागमनही झाले
स्वर्ग वाटे चार बोटे
गोड बोलून बोलून
मजलेही चढवले
खालच्या शिडीला मात्र
चक्क लाथाडून दिले
काय म्हणावे भोगाला
वृद्धाश्रमात टाकले
नशिबाचे भोग सारे
कुणाला ना चुकले
भावनावेगात झाले
मोठ्या घरास आतुर
मुलाने कृतघ्नपणे
सारले आईबाप दूर