निसर्ग कविता
निसर्ग कविता
झाला आनंदी आनंद
आले मिरूग नक्षत्र,
नभ उतरून आले
दृष्टी सुखाचे अप्रुप...
तृष्ण अवनी होऊन
वाट आतुर पाहून,
कधी बरसेल ढग
थेंब येतील धावून...
जमलेले ढग पाही
मनी सुखाचे उधाणं,
शेत शिवार फुलले
खुश झाड वेली पाणं...
नभ पाहता पाहता
मनी फुलोरा सुखाचा,
नदी नाले भरूनिया
वास राही निसर्गाचा...
असे वरदान मिळे
धन्य होई शेतकरी,
डोलणारे पीक पाही
जीव जडे भूमीवरी..
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷