निसर्गराजा
निसर्गराजा
हिरवाई दाटे, मंद गार वारा
खुललासे इथे, निसर्ग हा सारा ....!! १ !!
ताड माड वृक्ष , उंच उंच झाडे
नारळ पोफळी , डौलताहे वेडे
(2)
निळाईच्या लाटा, अपार अथांग
टाकताचि पाय, उमटे तरंग....!! २ !!
लाटांवरी लाटा, भरतीची दाटी
चिंब भिजे देह, सुख गळाभेटी....!! ४ !!
निसर्गाचे दान, दुधाळ सागर
पाहता लोचनी, भासे अलवार !! ५ !!
बोटीतूनी जाता, सागर कुशीत
वेगवान मन, तुषार शिंपीत....!! ६ !!
उंच आकाशात, विहरू मजेत
निळाई पसरे, अंबर कवेत......!! ७ !!
सागर अथांग, ठाव घेई दृष्टी
कातर हृदय, भिरभिर सृष्टी.....!! ८ !!
निसर्ग हा रम्य, डोळ्यांत माईना
परतीची वाट, पाऊल पाहिना......!! ९ !!