नवे वर्ष
नवे वर्ष
1 min
14K
नवीन ही ऊर्मी
मनी दाटे हर्ष
घेऊनी आनंद
आले नवे वर्ष ।।१।।
आला जीवनात
सुखाचा हा क्षण
आनंदाची नांदी
उत्साहीत मन ।।२।।
नवा हा संकल्प
सुखी ठेऊ मने
गाऊ जण सारे
हे जीवनगाणे ।।३।।
एकचि मागणे
जगू समाधानी
नको रे कुणाची
आता मनमानी ।।४।।
नवीन वर्षाचे
करूया स्वागत
वाजे ढोल-ताशे
वाजत गाजत ।।५।।
नेहमी स्मरावे
सदा आठवावे
भरभराटीचे
वर्ष अठरावे ।।६।।