ओंजळ
ओंजळ
पहावया नेत्र हे
सुलोचन व्हावे लागते
प्रीतीस मिळवावया
आशा संपवावी लागते
शुद्ध जरी हा भाव
का स्वार्थ मनी वाटतो
तुझ्याविना तळ्यातला
स्वर्ग खाली भासतो
सजविला गालीचा मी
सुगंध कोण उधळीतो
उरलेल्या पाकळ्यात
निर्माल्य मज गवसतो
डोळे उचलून पाहावया
मन पापणी जडावते
अनोळखी मिलन ते
निशब्द जीवास सलते
हातातल्या हातातली
ओंजळ माझी वाटते
वेदना ही काय कमी
तुला मी परकी वाटते ...!!