Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Murari Deshpande

Others

2  

Murari Deshpande

Others

पंतप्रधान

पंतप्रधान

2 mins
233


कोट्यवधी जनतेच्या हृदयी होऊनी विराजमान

शपथबद्ध सेवेसी झाले पुनश्च पंतप्रधान ||धृ||


अभिमानाचा क्षण हा मोठा दीपावली जणू आली 

कोटी कोटी हृदयात खुशीची आतषबाजी झाली 

सुपुत्र ऐसा ज्याला जनता मानी जीव की प्राण ||


त्यागी जीवन नित्य परिश्रम राष्ट्र मानला देव 

स्वच्छ नीतीची मनात तुमच्या गौरवशाली ठेव 

कपट नीतीने लढणा-यांची केलीत दाणादाण ||


देशविरोधी साफ चिरडले घेत सुदर्शन हाती 

मनामनातून जागृत केल्या राष्ट्रभक्तीच्या ज्योती 

वाराणसीच्या जळात पावन करुनी गंगास्नान ||


जगेन मी तर देशासाठी झिजेन कण कण खुद्द 

करीन रक्षण राष्ट्राचीही इंच इंच सरहद्द 

पराक्रमी हे लष्कर आमचे गात असे गुणगान ||


रामबाण अन कृष्ण नीतीचे मूर्तिमंत हे रूप 

विश्रांती ना मुळी क्षणाची अथक तपस्या खूप 

सन्मानाने जनते कडूनी मिळे अलौकिक स्थान ||


दहशतवादी धर्मांधांना सुटलेही कापरे 

कर्दनकाळच आला त्यांचा म्हणती ते बाप रे 

भव्य हिमालय प्रसन्न होऊन देत असे वरदान ||


मनामनाशी बात करुनी छान जोडली नाळ 

कारकीर्द ही राष्ट्रासाठी ठरली सुवर्णकाळ 

कर्तृत्वावर झाली जनता पुनश्च मेहेरबान ||


जाणून हेतू तुमच्या मनीचा पवित्र सुंदर नेक 

जात-पात विसरून क्षणातच झाला देशही एक 

दुकानदारी जातींचीही सोडूनी गेली प्राण ||


कराल तुम्ही राष्ट्राला या विश्वाचाही गुरु 

लावून खांदा खांद्याला मग आम्ही शर्थही करू 

राष्ट्रासाठी कंबर खोचुनी करू श्रमांचे दान ||


गंगा यमुना सरस्वतीही आज जाहल्या धन्य 

देव म्हणाले मंदिरातले जनसेवक हा मान्य 

उचंबळोनी महासागरी आले भव्य उधाण ||


तुडवीत खडतर काटेरी पथ अनंत केला त्याग 

राष्ट्रासाठी होम सुखाचा अभिनव यज्ञ नि याग 

साफल्याच्या पुर्णाहुतीने पूर्णत्त्वास विधान ||


Rate this content
Log in