Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

प्रश्न मी तर उत्तर माझे बाबा

प्रश्न मी तर उत्तर माझे बाबा

1 min
325


आज ते परत म्हणाले, मला प्रश्न नको विचारत जाऊ बरं

तुला उत्तर देतांना, माझ्या जीवाला लागतो घोर


प्रश्न विचारून तू, मग माझ्या डोक्यात जातेस

वाटते मग, तू पण लोकांसारखं माझं डोकं खातेस


दुनियाभरचं टेंशन आहे गं पिल्लू माझ्या मागे

हरेक माणूस बघ माझ्याशी तोलून मापून वागे


पैसे,नाती सांभाळतांना माझी धांदल उडते

मन पण म्हणतंय बघ, हे माझ्यासोबतंच का घडते


मी पण काय करू गं, जमत नाही तुझ्या बाबाला

तुच कायम बळी पडतेस, माझ्या रोजच्या तापाला


ओरडतो तुझ्यावर, पण येते तुझी कीव गं

सांगत नाही कधी पण तुझ्यातच आहे जीव गं


दिवसा,कामाच्या व्यापात तुला वेळ देता येत नाही

रात्री झोपताना ही तुला कुशीत घेता येत नाही


माहिती मला तेव्हा, तुझा जीव खूप गं रडतो

पण हा तुझा सुपरमॅन तुझ्या साठीच तर धडपडतो


आज काल तू बिमार असते तर, मला करमतंच नाही

हुंदका आवरून हिला सावरतो, जेव्हा रडते तुझी आई


मला रात्री झोप येईना तर येतो तुझ्या रूम मध्ये

मग लहानपणीचा फोटो तुझा रडून पाहतो झूममध्ये


प्रश्न विचारणारी माझी चिमूकली,कधी एवढी मोठी झाली

आट्यांमध्ये प्रश्न हा आजकाल राहतो माझ्या कपाळी


एकदा म्हणाले मला, सांग सोडून जाशील नाही ना या बाबाला?

मग मी उत्तर कसे देऊ तुझ्या सततच्या प्रश्नाला


त्यांच्या या प्रश्नाने, मात्र अनुत्तरीत झाली मी

एकच मागणे देवाला, खुश ठेव माझ्या उत्तराला, हात जोडून दोन्ही


Rate this content
Log in