Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Medha Desai

Others

3  

Medha Desai

Others

प्रवास

प्रवास

1 min
255


माझा साहित्यातील प्रवास 

मनाला परमानंद देणारा ठरला  

वाचन,लेखनाचा छंद जोपासल्यावर

मनाचा गाभारा अत्यानंदाने भरला १


मजल दरमजल करत करत

कथा,कादंबर्या वाचत राहिले

अधत्माचीही कास धरल्यावर

भक्तिमार्गातून प्रगल्भ विचार पाहिले २


माझा हा साहित्याचा प्रवास कल्याणकारी

जीवनाच्या अंतापर्यंत साथ देणारा

पुस्तकांचा खजिना जवळ ठेवल्यावर

माणसाचा एकटेपणाही नाहीसा करणारा २


दुबई,युरोप मस्त फिरून आल्यावर

प्रत्येक देशाचे वेगळेपण अनुभवले

त्यांचा विकासाचा चढता क्रम पाहिल्यावर 

मनसोक्त सौंदर्यास्थळे पाहून खूप सुखावले ४


आपल्या देशाच्या काश्मीर,उटी, केरळने

नयनरम्य निसर्गातून थंडावा दिला

तीर्थक्षेत्रे,अष्टविनायकांच्या हृद्य दर्शनाने

भक्तीचा मळा सौख्याने फुललेला पाहिला ५


माणसाने असा प्रवास करत रहावे

म्हणजे आनंदी,तणावमुक्त जीवन मिळते

दानधर्म,सेवाभाव जीवनात रुजवावे

तेव्हा मित्रांबरोबर आपुलकीने रहाण्याचे कळते ६


Rate this content
Log in