Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mrudula Raje

Others

5.0  

Mrudula Raje

Others

पुढे पुढे चालावे

पुढे पुढे चालावे

1 min
546

आयुष्याच्या रस्त्यावरती मार्गक्रमण करावे ।

पुढे पुढे चालत आपले ईप्सित साध्य करावे ॥

मार्ग जरी किती असेल अवघड,

वदनी हास्य विलसावे।

काटे जरी रुतले पायी,

गुलाबपुष्प सदा खुडावे ॥

जुन्या जाणत्या लोकांचे मार्गदर्शन घ्यावे।

ध्येय ठेवून एक मनामध्ये पुढे पुढे चालावे ।।

आशीर्वाद लाभतील तयांचे नम्र सदा वागावे।

शिकवण त्यांची मनी बाळगून जगात मोठे व्हावे ॥

पुढे पुढे चालत आपले ध्येय साध्य करावे।

कार्य आपले इतरांनाही मार्गदर्शक ठरावे॥

कीर्ती, प्रतिष्ठा, सौख्य-संपदा , सारे प्राप्त करावे।

पुढे चालत आयुष्याचे उच्च शिखर गाठावे॥

Rate this content
Log in