राधाकृष्ण प्रेम
राधाकृष्ण प्रेम
2 mins
216
राधा कृष्ण प्रेम
निशु शब्दिका काव्य
जिथे पहाते तिथे
तो एकमात्र
कृष्णच कृष्ण
दिसे तिला सर्वत्र 1
राधेचे मनी चाले
हरी चिंतन
कृष्ण कृष्ण ची
बोले तिचे कंकण 2
कृष्ण वाजवी पावा
बावरी राधा
वळूनी पाहे
प्रीती ची तीज बाधा 3
वृंदावनी ती खेळे
हरीचा संग
राधा मुरारी
खेळण्यात ची दंग 4
मुरलीचा तो नाद
पडता कानी
बावरी राधा
होई कृष्ण दिवानी 5
मूर्ती मंत हे प्रेम
भक्ती प्रतिक
ते अव्दैताचे
प्रेम त्यांचे सात्त्विक 6