Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Others

5.0  

Chandan Pawar

Others

साहेब, तुम्ही राहिले असते तर..

साहेब, तुम्ही राहिले असते तर..

1 min
343


साहेब , तुम्ही राहिले असते

तर खूप बरे झाले असते ;

विद्यार्थ्यात दीर्घउद्योग -चिकाटीचे

गुण तरी रुजले असते .


साहेब ,तुम्ही राहिले असते

तर खूप बरे झाले असते ;

जात- धर्म -भाषा द्वेषाने

राष्ट्रीय ऐक्य दुभंगले नसते .


साहेब, तुम्ही राहिले असते

तर खूप बरे झाले असते ;

शिक्षणाच्या बट्ट्याबोळ न होता

बाजारीकरण तरी झाले नसते .


साहेब, तुम्ही राहिले असते

तर खूप बरे झाले असते ;

सत्ता- खुर्ची पेक्षा देशप्रतिष्ठेला

जास्त महत्त्व राहिले असते .


साहेब , तुम्ही राहिले असते

तर खूप बरे झाले असते ;

स्वातंत्र्य- समता- बंधुता तत्वावर

राष्ट्र उभारले गेले असते .


साहेब ,तुम्ही राहिले असते

तर खूप बरे झाले असते ;

मानवतेला काळिमा फासणारे

" खैरलांजी हत्याकांड" घडले नसते .


साहेब, तुम्ही राहिले असते

तर खूप बरे झाले असते ;

संसद- विधिमंडळात

जोडेनाट्य तरी घडले नसते .


साहेब, तुम्ही राहिले असते

तर खूप बरे झाले असते ;

भारतीय लोकशाही लिलावाचे

अघोरी कृत्य घडले नसते .


साहेब ,तुम्ही राहिले असते

तर खूप बरे झाले असते ;

आपले राष्ट्र "ज्ञानसत्ता" होऊन

" महासत्ता" तरी झाले असते .



Rate this content
Log in