सांजवात...
सांजवात...
माझ्या मनाच्या देव्हाऱ्यात ,
मंद तेवते सांजवात ,
तू गाभाऱ्यात ,
अंतरंगी जळते मी फुलवात ...
उंबरठ्याचा मोठा घाट ,
शब्द देऊनही फसला ,
नजरेचा धोका कसा ,
मनात तू वसला ...
ना पहली जात पात ,
ना नात्याची आठवली गाठ ,
प्रीतीची आर्त हाक ,
तोडली श्रुंखलेची वाट ...
ही अनामिक आर्तता ,
प्रेम करेल पूर्तता ,
दोष नका देऊ मजला ,
मी ना केला विश्वासघात ...
मंद तेवते सांजवात ...