शब्दं जेव्हा...
शब्दं जेव्हा...
प्रेमात चांदणे डोळ्यात ,
माळायला लागले,
माणसांच्या गर्दीला ,
वगळायला लागले...
उंबरठा ओलांडून मन ,
धावायला लागले,
दुर पक्षांच्या थव्यात ,
गुंतायला लागले...
प्रेमात युगलांना ते,
पळताळायला लागले ,
इथेच मर्यादा प्रेमाला,
घालायला लागले...
निषिद्ध प्रेमाचे सावळ,
आवळायला लागले,
तोडूनी बंधने सारी मन,
पळायला लागले...
शब्दं जेव्हा ओंजळीतून ,
गळायला लागले,
दुःख त्यांना सांडण्याचे ,
कळायला लागले...