Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pavan Pawar

Tragedy Thriller

4  

Pavan Pawar

Tragedy Thriller

!! स्थापना !!

!! स्थापना !!

1 min
234


भाषावार प्रांतरचनेचा स्विकार करुनी तुकडे झाले देशाचे,

जन्म सांगतो महाराष्ट्राचा त्याग आणि बलिदानाचे.

सत्ताधिषानी ठरविले होते द्वीभाषीक याला बनवायचे, 

मराठी वाघही लढले महाराष्ट्राला मराठीमय करायचे.


सन होते १९०५ स्विकार झालता भाषावर प्रांतरचनेचा,

प्रांतिक समित्या स्थापन करुनी धरा वाटल्या भाषेच्या.

मुंबई , वहाड असो वा मध्य प्रांत तसेच हैद्राबादच्या मराठीला,

ताम्हणकरांनी एकसंघ महाराष्ट्राचा विचार होता मांडला.  


साहीत्य सम्मेलन असो व असो राजकीय व्यासपीठ,

भाषीक प्रांताच्या नेत्यांनी फक्त आश्वासने दिली.

मराठी भाषीक प्रांतांना एकत्र आणण्यासाठी,

संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना तेव्हा झाली.


मराठी भाषेच्या विवीध प्रांत रचनेचे ठराव आले,

महान विचारवंतानी ते सर्व फेटाळूनी लावले. 

ऐक मराठी मानसा मी महाराष्ट्राचा इतिहास सांगतोय, मी मराठी बोलतोय.


सावरकर, करंदीकर , डॉ . केदार असो वा मुकुंदराव जयकर.

संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडणारे होते मांडखोलकर,

संयुक्त महाराष्ट्र परीषद भरीव स्वरूपात कृती करू शकणार नाही,

अशी शंका व्यक्त करणारे होते भाई डांगे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


दार आयोगाच्या शिफारशीवर काकासाहेबांची टिका असे,

हीरे, बापट यांनी चळवळीला दिलेले उग्र रूप दिसे.

भंडारे यांचा मुंबईसह महाराष्ट्राचा पारीत असा ठराव आला,

साबळे, साठे, ठाकरे, अमरशेखच्या त्यावर बोचऱ्या टिका झाल्या.


दिवस उजाडला १ मे 1960 जन्म झाला महाराष्ट्राचा,

सूर्य उगवला होता मराठी अस्मीतेचा.

शहीदांची आठवण राहू दया जरा 

१०५ शहीदांच्या बलिदानाने पावन झाली होती धरा.

बेळगाव सह 865 गाव बाजुला सारुनी तुझा सन्मानायक आजही हसतोय,

जाग मराठी माणसा मी मराठी बोलतोय.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy