सुख माहेरचे.....
सुख माहेरचे.....
सुख माहेराचे
सांगा वर्णू कसे
बालअमृताचे
पांग फेडू कसे.
तळहाताच्या
फोडापरी
माय-पित्याने
मला जपले.
हट्ट माझे हो
कित्येक पुरवले.
ना हिशोब कशाचा
ना गिनती कशाची
मांडवात ही माझा
रुखवत पाहुनी
लोकांचे डोळे
हो दिपले.
माहेर प्रेमाचा पुर असतं,
प्रत्येक मुलीसाठी
न फिटणार ऋण असतं,
नेहमीच ते परिपूर्ण असतं.
न सांगताच मनातलं
जाणून घेणार मायेचं
दुकान असतं,
दुकान जरी असलं तरी
सार काही फ्री असतं.
लाभो जन्मोजन्मी
हे माहेराचे स्वर्ग सुख
माझे माहेर पंढरीचे रुप
विठ्ठल-रुक्मिणी माझे
जणू आई-बाप.
नांदते इथे कृष्णाचे
हो गोकुळ
उपभोगूनिया हे सुख
होते तृप्त हो मन.