सव्वीस एप्रिल(26)
सव्वीस एप्रिल(26)
1 min
12.1K
सव्वीस एप्रिलची सांज....!
तुझ्या ओढीच गुपित
त्या चंद्राने ग जाणलं
आणि चटकन
डोळ्यात पाणी आणलं...
चार हातांच अंतर
चार कोसाहून दूर ग झालं
त्यानं पाहताच पुन्हा
जास्तच ग ते वाटलं...
तरी आज
चंद्रानचं चांदणीला खेचलं
हितगुज त्यांचं ग
अनायसे यानेच ग पार पाडलं...
दूर राहुनी पाहू नको ग
आठवून हृदय घायाळ झालं
तुझ्या आठवणीने
चंद्रालाच ग हसू फुटलं....!