तरू
तरू
त्या उंच उंच
हिरव्या टेकडीवर
आहे एकच तरू
चला आपण तिथे जाऊ
धुंध त्या वातावरणात
थंड-गार वारा तनुवर झेलू
ऊन -पावसाचा तिथे नजारा
डोळ्यात साठवून घेऊ
साथीला पक्षी मनोहर
गट्टी तयांशी चला करू
फुलपाखरांचे सुंदर नर्तन
त्यांच्या तालावर जरा थिरकू
झाडावरची फुले मोहक
ओंजळ भर -भरून नेऊ
स्वप्नवत हे नगर अनभवू